नाकाबंदी दरम्यान जळगाव शहरात 63 लाखांची रोकड जप्त

जळगावः पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अमळनेर तालुक्यात कोटीची रोकड सापडली होती. यानंतर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासणीत कारमध्ये ६३ लाखांची रोकड मिळून आली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.याच नाकाबंदी दरम्यान जळगावतालुक्यातील कासोदा येथे दीड कोटीरुपये तर अमळनेर तालुक्यातीलचोपडाई येथे १६ लाख ३८ हजाररुपये सापडून आले होते. यानंतर पुन्हा एकदा जळगाव शहरात ६३लाखांची रोकड सापडून आल्यानेजळगावात खळबळ उडाली आहे.

शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान रोखण्यात आलेल्या एका कारमध्ये रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी हि रोकड जप्त करून मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here