मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे आज राज्यातील 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील तीन जणांचा यात समावेश आहे. या यादीमध्ये माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणी ताई खडसे, आणि दिलीप खोडपे यांच्या नावाचा समावेश आहे.
राज्यात इतर पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असताना एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आज यादी जाहीर झाल्यानंतर जळगाव ग्रामीणमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची मंत्री गुलाबराव पाटील तर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांची विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, आणि जामनेरमधून दिलीप खोडपे यांची भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याशी कडवी लढत देणार आहे.