ठरल तर मग; लाडका मामा विरुद्ध लाडकी बहीण, जयश्री महाजन यांना ठाकरेगटाकडून उमेदवारी जाहीर…

जळगाव समाचार डेस्क | २४ ऑक्टोबर २०२४

जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी देत, शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. जयश्री महाजन या आता भाजपचे दोन वेळचे आमदार राजूमामा भोळे यांच्याविरुद्ध थेट लढत होणार आहे.

जिल्ह्यात दोन महिला खासदार असून आता महाजन यांची उमेदवारी निश्चित झाल्याने शहरवासीयांना शहरातून महिला नेतृत्व विधानसभेवर पाठवण्यासाठी मोठी संधी प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे. माजी महापौर म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनमानसात चांगला प्रभाव आहे. “लाडकी बहीण विरुद्ध लाडके मामा”अशी ही लढत बघायला मिळणार आहे. शहरात जयश्री महाजन विरुद्ध राजूमामा भोळे ही थेट लढत जळगावच्या राजकारणात नवीन पर्वाची नांदी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here