जळगाव समाचार डेस्क| २२ ऑक्टोबर २०२४
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ऊबाठा) गटाची जळगावातील जागा यंदा माजी महापौर व निष्ठावंत शिवसैनिक विष्णू भंगाळे यांना मिळण्याची शक्यता आहे, असे सुत्रांकडून समजते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील गोंधळामुळे जळगाव शहर व ग्रामीण भागात तिकीट वितरणावर मोठे प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना यंदा तिकीट मिळणे कठीण होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेनेच्या जळगावातील गटात, विष्णू भंगाळे यांचे नाव अग्रस्थानी आहे. माजी महापौर म्हणून त्यांनी केलेले काम, तसेच पक्षावरील त्यांची निष्ठा, त्यांना या निवडणुकीत तिकीट मिळवून देऊ शकते. दुसरीकडे, राष्ट्रवादी पक्षाच्या हालचालींमुळे शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटासाठी जोरदार स्पर्धा होत असून, आगामी निवडणुकीत शिवसेना कोणाला प्राधान्य देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.