जळगाव समाचार डेस्क| २० ऑक्टोबर २०२४
येथील श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान, बहीरम गल्ली, पारोळा यांचा २८ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी, सोमवारी, दुपारी १२ ते २ या वेळेत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाआरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज मंदिर संस्थान तसेच युवा विश्व सोशल ग्रुप प्रणित श्री. गजानन महाराज मित्र मंडळ, पारोळा यांच्याकडून करण्यात आले आहे.