जळगाव ;– के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत मॅनेजमेंट च्या फिन्टेक विभागातर्फे बँकिंग मधील आर्थिक सेवा व संरक्षण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले . व्यवस्थापन मधील फिनटेक द्वारे सुनील पाटोडीया वेल्फेअर फाउंडेशन अर्थ निर्मिती व स्वयंम प्लस आणि चॉईस इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित केला . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री जाहेद शेख चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड क्लस्टर हेड आणि श्री महेश लोखंडे सहायक व्यवस्थापक चॉईस इंटरर्नॅशनल होते. त्यांनी कोरोना आणि इतर आर्थिक संकटामुळे देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वित्तीय क्षेत्रात मनुष्यबळाचीवाढती मागणी आहे, पण त्या तुलनेत आपल्याकडे कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही त्यामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करा आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारी आर्थिक फसवणूक, स्मार्ट गुंतवणुकीसाठी धोरणे ,बँकिंग क्षेत्रात झालेली भरभराट या विषयी जागरूकता निर्माण केली भा रतात .बी.एफ.एस. आय म्हणजेच विमा, बँकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. वित्तीय सेवांमध्ये अनेक म्युच्युअल फंड, शेअर ब्रोकर, वितरक काम करीत आहेत बँका म्हणजे सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा एकाच छत्राखाली देणाऱ्या संस्था बनत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये उज्ज्वल करिअर करण्याची फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे हे निश्चित.कार्यक्रमाच्यावेळी के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी , अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार ,व्यवस्थापन शाखेतील फिनटेक विभागाचे प्रमुख प्रा शेफाली अग्रवाल ,प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी ओच्छानी व हर्षा ओच्छानी यांनी केले .