जळगाव ;- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनीनी “महिषासुर वध “हा देखावा सादर केला. आपला भारत देश हा विविध संस्कृतींची आणि धार्मिकतेची उपासना करणारा देश आहे .या सर्व गोष्टींचे अवचित्य साधून विद्यार्थ्यांनीनी वेगवेगळ्या नऊ देवींचे रूप, एक राक्षस व वाघ या भूमिका साकारतौ “महिषासुर वध” हा देखावा सादर केला. यावेळी सरस्वतीच्या फोटोचे पूजन आणि कुमारिकांचेपूजन शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी केले आणि मुलांना कशाप्रकारे देवींनी वाईट प्रवृत्तींचा नाश करून असुरांवर विजय मिळवला याची माहिती सांगितली. तसेच नवरात्र उत्सवामध्ये सर्वात उत्साहाचा भाग म्हणजे “दांडिया रास “यावेळी सर्व माता पालक, शिक्षिका ,सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी या सर्वांनी मिळून “गरबा “खेळून आपला आनंद व्यक्त केला.शाळेमध्ये “सरस्वती पूजन” शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना नेमाडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मुलांच्या पाटीवर सरस्वती काढून पाटीचे पूजन करण्यात आले. आणि सर्वांनी मिळून सरस्वती स्तवन म्हटले. यावेळी विद्येची देवता माता सरस्वती देवीचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे मुलांना पटवून देण्यात आले.