Monday, December 23, 2024
HomeUncategorizedछत्तीसगडच्या तिघांकडून जळगावातील उद्योजकाची साडेआठ लाखात फसवणूक

छत्तीसगडच्या तिघांकडून जळगावातील उद्योजकाची साडेआठ लाखात फसवणूक

जळगाव: टायर रिमोल्डींग मशिन बनविण्याची कंपनी असल्याचे सांगत जळगावातील योगेश गोविंद चंदनकर (वाणी) (वय ५२, रा. शिव कॉलनी) या उद्योजकाकडून ८ लाख ६१ हजार ७५० रुपये घेऊन त्यांना नवीन मशिन न देता व जुन्या मशिनची दुरुस्तीही करून न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर योगेश चंदनकर यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मङ्क रामाराव भास्कर, नयन सिंग, अचल सिंग (सर्व रा. भिलाई, छत्तीसगढ) या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवकॉलनीत वास्तव्यास असलेले योगेश चंदनकर यांची औद्योगिक वसाहत परिसरात टायर रिमोल्डींगची कंपनी आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथील रवी

इंजिनिअरिंग कंपनीचे मडू रामाराव भास्कर हे व्यावसायिक भेटीसाठी चंदनकर यांच्या कंपनीत आले होते. टायर रिमोल्डींग मशीन बनविण्याची कंपनी असल्याचे त्यांनी चंदनकर यांना सांगत काही मागणी असल्याबद्दल विचारणा केली. त्यानुसार त्यांनी जुनी मशिन घेऊन नवीन मशिन विकत देण्याविषयी सांगितले. तसेच इतर जुन्या पाच मशिन दुरुस्तीविषयीदेखील भास्कर याला सांगण्यात आले. त्याने तसे कोटेशन पाठविले. त्यामुळे चंदनकर यांनी स्वतःच्या खात्यासह मुलांच्या खात्यावरून भास्कर यांच्या खात्यावर एकूण ८ लाख ६१ हजार ७५०मोठी रक्कम देऊनही नवीन मशिन मिळाले

नाही. तसेच अगोदरचेमशीनही दुरुस्त करून न मिळाल्याने चंदनकर यांनी भास्कर याच्यासह त्यांचे व्यवस्थापक नयन सिंग व अचल सिंग यांच्याशी संपर्क साधला. मात्र ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते, तसेच त्यानंतर त्यांनी कॉल घेणेही बंद केले. फसवणुकीची खात्री होताच दिली तक्रार संबंधितांकडून उडवाउडवीच्या उत्तरांसह कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने योगेश चंदनकर यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच या विषयी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मड्डू रामाराव भास्कर, नयन सिंग, अचल सिंग या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page