चोपडा :- सोयाबीन आणि तुरीच्या शेतात गांजाची केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सुमारे साडेसातशे किलो वजनाचा 45 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची कारवाई चोपड्यालगत असलेल्या डॅडी पाडा शिवारात केली आहे. संशयित रूमला चेचऱ्या पावरा रा.डेडी बापाडा याने शेतातील सोयाबीन आणि तुरीच्या पिकांच्या आड गांजाचे पीक लावलेले होते. याबाबतची माहिती पोलीस सूत्रांना मिळाल्याने त्यांनी ही कारवाई केली.
हा ओला गांजा जमा करून बाजार समितीच्या तोल काट्यावर मोजला असता त्याचे वजन तब्बल साडेसातशे किलो भरले. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा संशयित आरोपी रुमल्या पावरा पसार झाला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

![]()




