दादर ते भुसावळदरम्यान धावणाऱ्या १०४ विशेष लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

जळगाव/मुंबई (वृत्तसंस्था). :- सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवा निमित्त आणि येणाऱ्या दिवाळी दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दादर ते भुसावळदरम्यान धावणाऱ्या १०४ विशेष लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

गणेशोत्सव, नवरात्री अन् दिवाळी सण. रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने दादर ते भुसावळदरम्यान धावणाऱ्या १०४ विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली.

गाडी क्रमांक ०९०५१ दादर-भुसावळ आणि गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ-दादर या दोन्ही विशेष गाड्या दर सोमवारी, बुधवारी आणि गुरुवारी धावणार असून त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०४९ दादर-भुसावळ धावणारी (२६ फेऱ्या) आणि गाडी क्रमांक ०९०५० भुसावळ-दादर या दोन्ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या दर शुक्रवारी धावणार आहेत. या गाड्यांना २७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल आहे. दोन्ही रेल्वेगाड्यांच्या वेळा, थांबे आणि डब्यांच्या रचनेत कोणताही बदल झालेला नाही.
सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांसह www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह विशेष ट्रेनच्या सर्व विस्तारित फेऱ्यांसाठी आरक्षण खुले झाले आहे. विशेष रेल्वेगाड्यांच्या सविस्तर थांब्यांसाठी www.enquiry.indianrail.gov.inला भेट द्यावी किंवा एनटीइएस अॅप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here