चोरी घरफोडी करणारे तिघे जेरबंद

जामनेर (प्रतिनिधी) : चोऱ्या घरफोडी प्रकरणातील तीन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून और परिसरात झालेल्या चोऱ्य घरफोड्यांच्या प्रकरणात या चोरट्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पहूर शिवारात इलेक्ट्रिक वायर केबल या सह शेती साहित्य आधी चोरी झाल्याचे प्रकार अलीकडे वाढत असल्याने आपण पोलिस अधीक्षक कविता नेरकर ,उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे ,पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते.दीपक सुरवाडे, विनोद पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, राहूल पाटील, अमोल पाटील, गोपाळ गायकवाड यांच्या पथकाला फिरोज खाटीक, इरफान शेख, फातिम शेख (रा. मदनी नगर, जामनेर) हे संशयास्पदरित्या रात्री फिरताना आढळून आल्याने त्यांच्याकडून साडेसात हजार रुपयांची रोकड लोखंडी टॉमी असा मध्यमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here