पिंपळकोठा येथे झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

एरंडोल:-तालुक्यातील पिंपळकोठा येथे एका बावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश भाईदास पवार (भिल) वय 22 असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेतातून काम करून परत येत असताना रस्त्यालगत असलेल्या शेखर पाटील यांच्या शेतातील भोकरच्या झाडाला सुरेश भाईदास पवार हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दादाभाऊ भिल यांना दिसून आल्याने मयत सुरेश याला तात्काळ पारोळा येथील कुठे रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोस्टेला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक संदीप सातपुते करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here