कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

पहूर , ता . जामनेर कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रुक येथे उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे

जीवन ज्ञानेश्वर भागवत ( वय – ३८ )असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या अनेक महिन्यांपासून जीवन भागवत हे आर्थिक अडचणींचा सामना करीत होते. त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्धपालांचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही त्यांना अपयश आले.

अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली .

पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले . पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . वैद्यकीय अधिकारी डॉ . संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत .

त्यांच्या पश्च्यात वृद्ध आई , पत्नी , लहान भाऊ , वहिनी असा परिवार आहे .घरातील कर्त्या पुरुषाच्या अकाली जाण्याने लोंढरी परिसरात शोक कळा  पसरली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here