पुणे ( वृत्तसंस्था) :-एकीकडे अल्पवयीन मुली महिला आणि तरुणी वासनेचे बळी ठरत असताना आता मुलेही बळी पडत असल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आले असून एका पाच वर्षे बालकावर तीन अल्पवयीन मुलांनी पॉर्न व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच वर्षांच्या अल्पवयीन बालकावर तिन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केला आहे. पीडित अल्पवयीन मुलाला पॉर्न व्हिडिओ दाखवत तीन जणांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पुण्याच्या कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पीडित पाच वर्षांचा मुलगा हा सोसायटीत खेळत असताना तिघांनी त्याला मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर अत्याचार केला.पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोरच आरोपींनी हे कृत्य केलं आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.