वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

वाशिम (वृत्तसंस्था) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी (दि.५) शेतकऱ्यांना  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता वाशीम येथील कार्यक्रमात बटन दाबून  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला.

या हप्त्यासाठी केंद्र सरकारने एकूण २० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. याआधी १८ जून २०२४ रोजी या योजनेचा १७ वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता.

पीएम मोदी आज वाशीम दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पोहरादेवीचे दर्शन घेत पूजा केली. तसेच त्यांनी आज येथील सभेला संबोधित केले. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना २०१८ मध्ये पहिल्यांदा सुरु करण्यात आली होती. देशभरातील छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक साहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. या योजनेतर्गंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ६ हजार रुपये जमा केले जातात. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here