जळगाव :-शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे दुचाकी चोरीचे दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना उमाळा बस स्टॅन्ड येथून चोरी झालेल्या दुचाकी चा तपास करीत असताना कुसुंबा येथील दोघांना चोरीच्या तीन दुचाकींसह अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे राहणारे भूषण झांबरे हे 19 सप्टेंबर रोजी कामानिमित्त दुचाकीवरून जळगाव कडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बस स्टँड जवळ थांबले असता त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 19 बी एल 93 34 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
झांबरे यांची चोरीची दुचाकी कुसुंबा शिवारातील तरुणांनी दुचाकी चोरल्याचे गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी
पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे आदींचे पथक तयार करून या पथकाने संशयित आरोपी पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय-२२ आणि निखिल जयराम पाटील वय-२१ दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.