आमदार राजू मामा भोळे यांनी घेतले भवानी मातेचे दर्शन

जळगाव (प्रतिनिधी) :-देशात सर्वत्र 3 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी आमदार राजूमामा भोळे आणि माजी महापौर सीमाताई भोळे यांनी सराफ बाजारातील भवानी पेठ येथील श्री भवानी देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.

यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी जळगावकरांसाठी प्रार्थना केली. या प्रसंगी मंदिरातील विश्वस्तांनी आमदार भोळे यांचे सपत्नीक स्वागत केले.यावेळी भाविकांशी आमदार राजूमामा भोळे यांनी संवाद साधला.

याप्रसंगी राजू बांगर, राजेंद्र वर्मा, गुरुजी महेश कुमार त्रिपाठी, लक्ष्मी कुमार त्रिपाठी, विनोद रतावा, किसनलालजी पुरोहित, संजय व्यास, परेश जगताप आदी या वेळेला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here