जळगाव– शेतातून काम आटोपून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याला गिरणा नदीच्या पात्रातून जात असताना पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने बुडून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना 2 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असून मयत शेतकऱ्याचा आज 3 रोजी मृतदेह मिळून आला.
जितेंद्र शांताराम बाविस्कर व 31 राहणार कानळदा तालुका जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जितेंद्र बाविस्कर हे दोन गाव शिवारात असणाऱ्या आपल्या शेतातून कामे आटोपून घरी परत असताना गिरणा नदी पात्रातून वाट काढत जात असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने ते या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. जितेंद्र बाविस्कर यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान मयत जितेंद्र बाविस्कर यांच्या पश्चात आई-वडील मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.