विक्रम लालवाणी, प्रतिनिधी पारोळा
पारोळा येथील न्यायालयात २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख न्यायाधीश श्री. एम. एस. काझी होते, तर पॅनल पंच म्हणून ॲड. व्ही. एस. काटे यांनी काम पाहिले. या लोकअदालतीत अनेक कौटुंबिक व आर्थिक प्रकरणांचे सामोपचाराने निपटारे करण्यात आले.
कौटुंबिक प्रकरणात तडजोडींची यशस्वी सोय
लोकअदालतीत पारोळा न्यायालयात प्रलंबित असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत, मनिषा सतिष जाधव वि. सतिष कृष्णा जाधव, निकीता प्रदीप पाटील वि. प्रदीप धनराज पाटील, तसेच सपना/धनश्री भारत शिंदे वि. भारत पंडित शिंदे यांच्या प्रकरणांत सामोपचाराने तडजोड घडवून आणण्यात आली. या प्रकरणांत संबंधित पती-पत्नींना एकत्र नांदविण्याचा निर्णय घेण्यात आला.
बँकिंग व अन्य आर्थिक प्रकरणांची तडजोड
लोकअदालतीत बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आय.डी.बी.आय. बँक, बीएसएनएल, पारोळा नगर परिषद आणि तहसील कार्यालयातील प्रलंबित आर्थिक प्रकरणांचे सामोपचाराने निपटारे करण्यात आले. एकूण ८० प्रकरणे निकाली निघाली असून, रु. २४,०३,९२६ तडजोडीनुसार वसूल करण्यात आले आहेत.
लोकअदालतीत उपस्थित अधिकारी व वकील
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि अनेक वकील उपस्थित होते. त्यामध्ये अॅड. अनिलकुमार देशपांडे, ए. आर. बागुल, आनंदराव पवार, अॅड. ए. डी. पाटील, दत्ताजी महाजन, अॅड. प्रशांत ठाकरे (वकील संघ अध्यक्ष), अॅड. गणेश मरसाळे (सचिव), तुषार पाटील, भुषण माने, आणि अन्य वकील सहभागी झाले होते.
यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम
लोकअदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि नगर परिषद कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. न्यायालयीन कर्मचारी एन. आर. पिंपळे, विलास ठाकुर, मधुसुदन बागड, एम. एस. पाटील, आणि श्रीमती एस. आर. पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने सोडविण्यात आली आणि अनेक पक्षकारांना तडजोडीद्वारे न्याय मिळाला.