जळगाव समाचार डेस्क | २८ सप्टेंबर २०२४
भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक यांना पत्र लिहून समाजकंटकाच्या वादग्रस्त विधानाबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. एरंडोल शहरातील आरीफ मिस्तरी नावाच्या व्यक्तीने काल सोशल मीडियावर समाजविघातक विधान प्रसारित केले, ज्यामुळे शहरातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे, असे पक्षाचे पदाधिकारी म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, एरंडोल हे सामाजिक दृष्ट्या संवेदनशील शहर आहे आणि अशा प्रकारच्या विधानांमुळे शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. पक्षाने पोलीस प्रशासनाला यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली असून, दोषी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पक्षाने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने या प्रकरणात योग्य ती कारवाई केली नाही, तर पक्ष स्वतः अशा प्रवृत्तींना त्यांच्या भाषेत उत्तर देईल.