जळगाव समाचार डेस्क | २८ सप्टेंबर २०२४
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त तालुका स्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जळगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण शाळांसाठी खुली आहे. स्पर्धा २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता गांधीतीर्थ येथील कांताई सभागृहात होणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, तसेच विजेत्यांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि १५००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा संपल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येतील आणि यशस्वी शाळांना स्मृतिचिन्हांसह रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातील.
स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असून, जळगावातील सर्व शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (मो. ९८२३०६२३३०) किंवा गिरीश कुळकर्णी (मो. ९८२३३३४०८४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी एक उत्तम संधी आहे, असे आयोजकांनी सांगितले.