जळगाव शहरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक…

0
64

जळगाव समाचार डेस्क| २७ सप्टेंबर २०२४

एका २० वर्षीय तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मेहरूण तलाव परिसरातील झुडपात अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपी करण दत्तू सोनवणे (वय २०, रा. कांचननगर, जळगाव) याच्यावर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी करण सोनवणेने मुलीशी ओळख निर्माण करून तिला वेळोवेळी दुचाकीवर फिरायला नेले. १० सप्टेंबर रोजी तो मुलीला उच्च माध्यमिक विद्यालयापासून मेहरूण तलावाच्या झुडपात घेऊन गेला आणि तिथे तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीने २६ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून करण सोनवणे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रिया दातीर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here