संतापजनक; अमळनेरमध्ये बंद शाळेच्या गच्चीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

0
62

 

जळगाव समाचार डेस्क | २५ सप्टेंबर २०२४

अमळनेर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीला शाळेत सोडून घरी जात असताना दिनेश शांताराम भिल (रा. शांताबाई नगर) या आरोपीने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने रिक्षात बसवले. आरोपीने पीडितेला पिंपळे रोडवरील बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. मुलीने विरोध करत आरडाओरड केली, मात्र त्या परिसरात कोणीही नसल्याने तीला मदत मिळू शकली नाही.
आरोपीने मुलीला धमकावत, “माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल,” अशी धमकी दिली. मुलगी घरी परतत असताना तिच्या आई-वडिलांना भेटली आणि त्यांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी तात्काळ मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली आणि पुरावे गोळा केले. आरोपी दिनेश भिल याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here