बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 6 ठार, 18 जखमी

0
39

 

जळगाव समाचार डेस्क | २० सप्टेंबर २०२४

जालना जिल्ह्यातील जालना-वडीगोद्री रोडवर आज सकाळी शहागड गावाजवळ बस आणि आयशर ट्रकची भीषण धडक झाली. या भयंकर अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून, 18 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघातग्रस्त बस अंबाजोगाई आगाराची असून ती जालन्याकडे जात होती. अंबडपासून अवघ्या 10 किमी अंतरावर ही बस आयशर ट्रकला धडकली. ट्रक बीडहून जालन्याकडे मोसंबी घेऊन जात होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आयशर ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता, त्यामुळे बसला जोरदार धडक बसली.

अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांना धडकल्याने जालना-बीड मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here