जळगाव समाचार डेस्क | १८ सप्टेंबर २०२४
पारोळा येथील कल्पना फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
सत्कार समारंभात फाउंडेशनतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी मंचावर मंडळाचे ज्येष्ठ सभासद भाऊसो राहुल नांदेडकर, दिलीप महाजन, मिरज गुजराती, अनिल लोहार, पंकज गुजराती, अमोल जगदाळे, सचिन गुजराती, राहुल महाजन, लोकेश महाजन, पराग मराठी, रमेश महाजन, सुरेश महाजन, सुनील शेठ गुजराती, पंकज चौधरी, तुषार चौधरी आणि इतर सर्व ज्येष्ठ मंडळ सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल महाजन यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मंडळ सदस्य आणि फाउंडेशनकडून पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावे: दिलीप महाजन, विनोद पाटील, गोरख सूर्यवंशी, राहुल महाजन आणि न्यू दोस्त गणेश मंडळ.