जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४
लोकप्रिय अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिनाने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हिना खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. या धक्कादायक माहितीने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. आणि तेवढ्यात तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे तिचा बॉयफ्रेंडही तिला आता सोडून गेल्याच्या चर्चा आहेत.
हिना खानचा मोठा खुलासा
हिना खानने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, “आयुष्यात मी एक गोष्ट शिकले आहे, प्रेम करणारे लोक तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. जे सोडून जातात, ते फक्त वापर करतात.” हिनाच्या या वक्तव्यामुळे तिच्या खासगी आयुष्यातील समस्या उघडकीस आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तिच्या या विधानानंतर ती आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कॅन्सरनंतर ब्रेकअपची चर्चा
ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर हिना खानच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या ब्रेकअपची चर्चा रंगत असून, कॅन्सर निदानानंतर तिच्या बॉयफ्रेंडने तिला सोडून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी हिना जीममध्ये वर्कआउट करताना दिसली होती. तिच्या आरोग्याच्या बाबतीत ती नेहमीच सजग असून, चाहत्यांसाठी ती नियमितपणे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.