राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 9 व 10 सप्टेंबर ला जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

जळगाव समाचार डेस्क | ७ सप्टेंबर २०२४

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाल्यानंतरचा हा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय, आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींशी ते यावेळी चर्चा करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here