जळगाव जिल्ह्यातील खून प्रकरणाचा छडा; चार आरोपींना अटक (व्हिडीओ)

जळगाव समाचार डेस्क | ७ सप्टेंबर २०२४

अडावद गावालगत हजरत पिरपाकरशा बाबाच्या दरग्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडवली होती. या खून प्रकरणाचा तपास करत, अडावद पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी अडावद गावाचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलिसांना दरग्याजवळ एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाची ओळख जगदिश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा. पाटचारी, अडावद) अशी पटली. प्राथमिक तपासात मृताच्या शरीरावर गंभीर मारहाणीचे व्रण दिसून आले आणि गळा आवळल्याचे चिन्हे आढळले.

या प्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे चार आरोपींची नावे समोर आली. इरफान अब्दुल तडवी, शाहरुख इस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजिद आणि कलिंदर रशिद तडवी या चार आरोपींनी गांजाच्या नशेत जगदिश सोलंकी याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली.

घटनेच्या दिवशी आरोपींनी गांजा ओढताना मृत सोलंकीने त्यांना टोमणे मारल्याने संतापून, त्यांनी त्याला जबर मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून ठार मारले. त्यानंतर मृतदेह दरग्याजवळ फेकून दिला.

व्हिडीओ

फेसबुक लिंक

https://www.facebook.com/share/r/E4JN1wNmt7EoZET3/?mibextid=uSdriS

 

इन्स्टाग्राम लिंक

पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, १० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि प्रमोद वाघ आणि त्यांची टीम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here