महेश प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा संयोजक पदी निवड…

जळगाव समाचार डेस्क| १ सप्टेंबर २०२४

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा कामगार मोर्चाने एक महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली आहे. प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या सूचनेनुसार महेश प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते महेश पाटील यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रदेश सचिव सुधा काबरा, कुमार सीरामे, महानगर जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, महेश आंबिकर, हरीश परमार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या नियुक्तीमुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा कामगार मोर्चाची संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here