बायकोला चिप्स आणायला सांगत 30 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…

 

जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑगस्ट २०२४

यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे एका 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. स्वप्निल देविदास चौधरी (वय ३०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी घरातील दुसऱ्या खोलीत गळफास लावून जीवन संपवले.
प्राप्त माहितीनुसार, स्वप्निल चौधरी हे घरी असताना त्यांनी पत्नी पूनम चौधरी यांना “माझ्यासाठी चिप्स तळून दे, मला चिप्स खायचे आहेत” असे सांगितले. पूनम यांनी किचनमध्ये जाऊन चिप्स तळण्यास सुरुवात केली. या दरम्यान, स्वप्निल यांनी घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. चिप्स तयार झाल्यानंतर पूनम यांना पतीला चिप्स देण्यासाठी गेल्या असता, त्यांनी गळफास घेतलेला आढळून आला. या दृश्याने पूनम यांनी जोरात आक्रोश केला, ज्यामुळे आजूबाजूचे लोक तातडीने त्यांच्या मदतीला धावले.
स्वप्निल यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सदस्य अरूण पाटील, भरत चौधरी, तसेच सेनेचे मुन्ना पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन मयताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावल पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here