जळगाव समाचार डेस्क| ३१ ऑगस्ट २०२४
पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार १० जुलै रोजी रात्री ११ वाजता घडला. आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती केली आणि हा प्रकार कुणाला सांगितल्यास पतीसह मुलांना ठार मारण्याची धमकी दिली.
संबंधित प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्यावर झालेला अत्याचार हा तिच्या परिचयातील ४० वर्षीय मोहम्मद शेख लतीफ याने केला आहे. त्याने महिलेच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला आणि तिला धमकावले.
या घटनेनंतर महिलेनं रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर, आरोपीवर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.