सरकारने बदलली या 8 रेल्वे स्थानकांची नावे…

 

जळगाव समाचार डेस्क | २८ ऑगस्ट २०२४

 

उत्तर प्रदेशातील लखनऊ मंडळातील आठ रेल्वे स्थानकांची नावे मंगळवारी बदलण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेने जारी केलेल्या आदेशानुसार, कासिमपूर हॉल्टला आता जायस सिटी म्हणून ओळखले जाईल, जायस रेल्वे स्थानकाला गुरु गोरखनाथ धाम म्हणून, मिसरौलीला मां कालिकन धाम म्हणून, बणी रेल्वे स्थानकाला स्वामी परमहंस म्हणून, निहालगढला महाराजा बिजली पासी म्हणून, अकबरगंजला मां अहोरवा भवानी धाम म्हणून, वारिसगंजला अमर शहीद भाले सुल्तान म्हणून आणि फुरसतगंजला तपेश्वरनाथ धाम म्हणून ओळखले जाईल.
या स्टेशनांची नावे संत, स्वातंत्र्यसैनिक आणि स्थानिक आश्रमांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. असे पहिल्यांदाच घडले नाही, याआधी देखील अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. या निर्णयाचा उद्देश सांस्कृतिक ओळख आणि वारसा जपणे हा आहे. उदाहरणार्थ, गुरु गोरखनाथ धाम आश्रम जायस रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्यामुळे, स्थानकाचे नाव बदलून आश्रमाच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे, अकबरगंज आणि फुरसतगंज रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेल्या शिव आणि कालीच्या मंदिरांच्या नावावर स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत.
रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाकडे नसून, तो राज्य सरकारकडे असतो. राज्य सरकार निर्णय घेऊन गृह मंत्रालय आणि नोडल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवते. मंजुरी मिळाल्यानंतरच नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते. हे देखील पाहिले जाते की, बदललेल्या नावाचे दुसरे कोणतेही रेल्वे स्थानक आधीपासून अस्तित्वात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here