जळगाव समाचार डेस्क| २७ ऑगस्ट २०२४
श्री सूर्यकिरण फाउंडेशन जळगाव आयोजित दहीहंडी महोत्सव 2024 जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन उपस्थित होत्या तर यांच्यासह समाजसेविका रूपाली वाघ, गुणवंत झोपे, आणि योगेश पाचपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात विजेत्या संघास जयश्री महाजन यांच्या कडून 11001 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले, तर रूपाली वाघ यांनी 2100 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.
या वर्षीच्या दहीहंडी महोत्सवात 35 फूट उंचीची दहीहंडी बांधण्यात आली होती. श्रीकृष्ण मित्र मंडळाने सहा स्तर लावून ही दहीहंडी फोडली. या उत्सवात श्री सूर्यकिरण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत धांडे, भास्कर राणे, सुहास पाटील, दीपक सरोदे, आणि जे.टी. बोरोले आदि उपस्थित होते.
उत्साहाने भरलेल्या या महोत्सवात उपस्थितांनी आनंद लुटला आणि पारंपारिक उत्सवाची शोभा वाढवली.