राज्यात चाललंय काय? 3 हजारांची उधारी न चुकवल्याने पानवाल्याने अल्पवयीन मुलीला केले गर्भवती…

 

जळगाव समाचार डेस्क। २७ ऑगस्ट २०२४

 

चंद्रपूरमधून एक धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. तीन हजार रुपयांची उधारी न चुकवल्याच्या कारणावरून एका पानवाला चालकाने अल्पवयीन मुलीला आपली वासनेचा शिकार करून गर्भवती केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी या विकृत पानवाला चालकाला अटक केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नव्या सिनाला गावातील एका अल्पवयीन मुलीवर हा भयंकर अत्याचार झाला आहे. पीडित मुलगी पानठेल्यावरून गुटखा घेऊन खात असे, ज्यामुळे तिच्या नावावर तीन हजार रुपयांची उधारी जमा झाली होती. या उधारीच्या बदल्यात 50 वर्षीय विकृत दुकानदाराने मुलीला शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली. या विकृत कृत्यानंतर मुलगी गर्भवती झाली.
घटनेचा उलगडा झाल्यानंतर पीडित मुलीने ही धक्कादायक गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.
ही घटना समजताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here