जळगाव शहरात मद्यधुंद पोलिसांचा सिनेस्टाईल थरार; हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल…

 

जळगाव समाचार डेस्क। २६ ऑगस्ट २०२४

 

भास्कर मार्केट परिसर २५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन पोलिसांनी आपल्या कृत्याने चांगलाच गाजवला असल्याचे उघडकीस आले आहे. हे दोन्ही पोलीस गणवेशातच एका बारमध्ये मद्यपान करत होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यात अचानक वाद झाला आणि तो वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारहाण सुरू केली. या हाणामारीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Jalgaon)
ही घटना घडल्यानंतर, पोलिसांच्या गाडीत असलेल्या चालकाने कार काढताना दोन दुचाकींना धडक दिली, ज्यामुळे त्या दुचाकी पडल्या. याशिवाय, काही अंतरावर गाडी चालवत असताना एक सायकलस्वार मुलाला धडक दिली. सुदैवाने, या अपघातात मुलाला फारशी दुखापत झाली नाही.
हे पोलीस जळगाव जिल्ह्यातीलच असून बंदोबस्तासाठी शहरात आले होते. या घटनेमुळे पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here