जळगाव समाचार डेस्क। २५ ऑगस्ट २०२४
नेपाळमधील बस अपघातात मृत झालेल्या भुसावळ तालुक्यातील दोन कुटुंबांचे मृतदेह बदलल्याने तणाव निर्माण झाला. भुसावळ येथील भारंबे कुटुंबातील सुलभा पांडुरंग भारंबे यांचा मृतदेह वरणगावला, तर वरणगाव येथील सागर जावळे यांचा मृतदेह भुसावळला पोहोचला.
मृतदेहांचे अदलाबदल झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये गोंधळ उडाला. नातेवाईकांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून मृतदेहांची अदलाबदल करून योग्य मृतदेह योग्य कुटुंबांपर्यंत पोहोचवला.
या घटनेमुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. नातेवाईकांनी अशा प्रकारच्या चुकांमुळे नाराजी व्यक्त केली आहे.

![]()




