(विक्रम लालवणी), प्रतिनिधी पारोळा
सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या, १६ ऑगस्ट रोजी पारोळा तालुक्यात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आला आहे.
बंदच्या निमित्ताने सकाळी बालाजी मंदिरापासून शहरात एक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सकल हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांगलादेशातील हिंदू समुदायावर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी हा बंद आणि निषेध मोर्चा आयोजित केला आहे. पारोळा तालुक्यातील विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक, आणि नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होऊन बांगलादेशातील हिंदू अत्याचारांचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

![]()




