जळगाव समाचार डेस्क| १४ ऑगस्ट २०२४
पाकिस्तानला तब्बल 32 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू अर्शद नदीम सध्या चर्चेत आहे, परंतु यावेळी त्याच्या कामगिरीपेक्षा वेगळ्याच कारणामुळे तो प्रकाशझोतात आला आहे. अर्शदने ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे मायदेशी परतल्यानंतर अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. पण अलीकडेच एका दहशतवाद्याने त्याची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/OsintTV/status/1822969784792756377?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1822969784792756377%7Ctwgr%5E06ce73ae470a341f16945fb304b21836497d53c6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fsports%2Folympic-champion-arshad-nadeem-conversation-with-un-designated-lashkar-terrorist-harris-dhar-in-pakistan-goes-viral%2F835671
हरिस धार यांची भेट आणि वादग्रस्त व्हिडिओ
नदीमने पाकिस्तानात परतल्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण, लष्कर-ए-तोयबाचा नेता हरिस धार, ज्याला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केले आहे, त्याने नदीमची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.
लष्कर-ए-तोयबाचा डाव?
या व्हिडिओमध्ये नदीम आणि धार यांची भेट ऑलिम्पिकनंतर झाल्याचं स्पष्टपणे दिसतं. या भेटीचं कारण अधिक तरुणांना लष्कर-ए-तोयबाकडे आकर्षित करण्याचा संघटनेचा डाव असल्याची चर्चा आहे. लष्कर-ए-तोयबा ही भारताविरुद्धच्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असलेली संघटना आहे. विशेषत: 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे याच संघटनेचा हात होता, ज्यामध्ये 197 जणांनी प्राण गमावले होते.
नदीमवर पुरस्कारांचा वर्षाव
अर्शद नदीमने आपल्या ऐतिहासिक कामगिरीने पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्याला पाकिस्तानमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जाणार असून, सोन्याचा मुकूट आणि लाखो पाकिस्तानी रुपयेही बक्षिस म्हणून दिले जातील. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला 92.97 मीटर अशी खास नंबर प्लेट असलेली कार बक्षिस म्हणून दिली आहे.
वादाच्या भोवऱ्यात अर्शद नदीम
ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शद नदीमचा उदय हे पाकिस्तानसाठी गौरवाची बाब असली तरी, त्याचं नाव आता वादग्रस्त चर्चेत आलं आहे. दहशतवादी हरिस धार याच्यासोबतची त्याची भेट आणि त्यावरून उठलेला वाद यामुळे अर्शदचा हा सुवर्णयशाचा क्षणही वादग्रस्त ठरला आहे.
ही भेट कशासाठी झाली याचा तपास पाकिस्तान सरकार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अर्शद नदीमच्या पुढील वाटचालीवर अनेकांचं लक्ष लागलं आहे.

![]()




