जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर जिल्हाध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांची शिंदखेडा विधानसभा (धुळे जिल्हा) निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे..
रिकु उमाकांत चौधरी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी जळगाव शहरात युवकांची संघटनात्मक बांधणी केली असून लोकांच्या प्रश्नांवर अत्यंत आक्रमक आंदोलने केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी रिकु चौधरी यांची शिंदखेडा विधानसभा (धुळे जिल्हा) निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी मोठी असून शिंदखेडा तालुक्यातील युवकांची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सक्रिय योगदान देईल अशा भावना रिकु चौधरी यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या शिंदखेडा विधानसभा निरीक्षक पदी पक्षाने नियुक्ती केल्याबद्दल रिकु चौधरी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.