जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार, निशांत विजय चौधरी यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर निशांत चौधरी यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भरीव कार्य होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांना संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निशांत चौधरी यांनी आपल्या या नव्या भूमिकेतून विद्यार्थ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि त्यांना योग्य दिशा देणे, हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट असेल.