“माझ्या आयुष्यात येऊ नको”… मेट्रोतच भिडले जोडपे… व्हिडीओ व्हायरल…

 

जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४

 

दिल्ली मेट्रोतील एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल मेट्रोमध्येच भांडण करत असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक तरुणी मेट्रोच्या डब्यात आपल्या सोबत असलेल्या तरुणाला मारते. तरुण तिला शांत राहण्याचे आणि हे सार्वजनिक ठिकाण असल्याचे सांगत असतो, परंतु ती त्याच्यावर हल्ला चढवत राहते. यानंतर तरुण तिला तिथून निघून जाण्यास सांगतो, पण तिने सोडलेले स्थानक आल्यानंतरही ती परत येऊन त्याला चापट मारते. शेवटी तरुण देखील तिला प्रत्युत्तरादाखल चापट मारतो.
तरुणी संतापून तरुणाला म्हणते, “थोडीतर इज्जत ठेव, लोक पाहत आहेत. मी आईला सांगणार आहे. असा मुलगा कोणालाही भेटू नये. माझ्या आयुष्यात येऊ नको.” या संपूर्ण प्रकाराची व्हिडिओ क्लिप मेट्रोमध्ये असलेल्या एका प्रवाशाने शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

https://twitter.com/dlazygirl/status/1786323238982922665?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1786323238982922665%7Ctwgr%5E8978e04ead3ea5f22d5ea446d57acd450518f90f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fget-out-of-my-life-a-couple-clashed-in-delhi-metro-viral-video-slapped-each-other-knp94

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव
हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे भांडण भाऊ-बहिणींच्या वादासारखे असल्याचे म्हटले, तर काहींनी लिंग समानतेचा मुद्दा उपस्थित करत, सार्वजनिक ठिकाणी तरुणीने तरुणाला मारणे अयोग्य असल्याचे नमूद केले आहे. तरुणाने सर्व परिस्थिती संयमाने हाताळल्याचेही काहींनी कौतुक केले आहे.
याआधीही दिल्ली मेट्रोमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच जागेच्या मुद्द्यावरून मेट्रोत वाद निर्माण झाला होता, ज्यात एक महिला पुरुषाच्या मांडीवर जाऊन बसली होती. अशा घटनांमुळे मेट्रो प्रशासन आणि पोलिसांनी मेट्रोमध्ये अश्लील वर्तन किंवा रील्स बनवण्यास मनाई केली आहे, परंतु तरीही असे प्रकार घडत आहेत.
दिल्ली मेट्रोमध्ये होणाऱ्या या घटना आता फक्त प्रवाशांमध्येच नाही, तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here