जळगाव समाचार डेस्क| ६ ऑगस्ट २०२४
सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नेते, राजकीय पदाधिकारी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचे काम सुरू केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर धरणगाव येथे त्यांच्या कार्यालयात गेले असता, त्यांना तिथे सट्टा चालू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि सट्टा चालत असल्याचे निदर्शनास आणले. (Jalgaon)
जळगाव ग्रामीण मतदार संघात यावेळीही विद्यमान पालकमंत्री आणि माजी पालकमंत्री यांच्यात लढत होण्याची दात शक्यता आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मविआ तर्फे उमेदवार असतील आणि त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी जळगाव ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत. धरणगाव येथे त्यांच्या कार्यालयात गेल्यावर, त्याच कार्यालयाच्या खाली खुलेआम सट्टा चालू असल्याचे त्यांनी पाहिले. विद्यमान पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या या प्रकारावर त्यांनी जोरदार टीका केली.
जिल्ह्यात खुलेआम सट्टा चालू असताना पोलिस यंत्रणा निष्क्रीय असल्याचे दिसत आहे. खुल्या रस्त्यावर सट्टा चालू असतानाही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही, हे फक्त जळगाव शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात घडत आहे, असे त्यांनी सांगितले. देवकर यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पोलिस प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी केली.

![]()




