जळगाव समाचार डेस्क| ३ ऑगस्ट २०२४
गुन्हेगारांना कायद्याची कसलीच भीती उरलेली नसल्याचे संपूर्ण राज्यातील परिस्थिती असल्यचे चित्र आहे. सर्रासपणे महिलांवर अत्याचार असो, चोरी असो कि खून… या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. अश्यातच भर वर्दळीच्या ठिकाणी चौकात डोंबिवली भोईरवाडी खांबलपाडा परिसरात भर चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची डोक्यात रॉड घालून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही खंबालपाडा परिसरात घडली आहे. अश्विन कांबळे असं मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपी रिक्षा चालकाचं नाव सुनील राठोड असं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या वादातून आरोपी सुनील राठोड याने अश्विन कांबळे यांची हत्या केली आहे. आरोपीने भर चौकात अश्विन कांबळे या रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड घातून हत्या केली. दरम्यान, टिळक नगर पोलीस याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.