जळगावकर इ-बाईक वापरताय? सावधान, शहरात इ-बाईक अचानक पेटल्याने खळबळ…

 

जळगाव समाचार डेस्क| २ ऑगस्ट २०२४

सध्या इंधन दर व प्रदूषणाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक जण इलेक्ट्रिक बाईक घेत आहे. जेणेकरून पर्यावरणाचा बचाव होईल. मात्र काल जळगाव (Jalgaon)शहरात अश्याच इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दि. 1 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ख्वाजामिया दर्गा परिसरातील लुंकड कन्या शाळेजवळ सक्षम नितीन सोनवणे (१७) महाविद्यालयीन तरुणाला गाडी चालवत असतांना इंजिन गरम झाल्याचे लक्षात आले. त्याने दुचाकी बाजूला लावली. मात्र त्याच वेळेला त्याच्या दुचाकीने पेट घेतला. दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. दरम्यान काही नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलावल्यानंतर त्यांनी आग विझवली. या घटनेत गाडीचे नुकसान झाले मात्र तरुणाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here