जळगावातील महिलेची गळफास घेत आत्महत्या…

जळगाव समाचार डेस्क। १ ऑगस्ट २०२४

जळगावातील (jalgaon) आव्हाणे शिवारात ४४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राणी श्यामकांत देशमुख असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, शहरातील आव्हाने शिवारतील ओमसाई नगर येथील रहिवाशी शामकांत देशमुख नेहमीप्रमाणे दि. ३० जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले. दरम्यान संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता घटना उघडकीस आली. याबाबत त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे, अनिल फेगडे, अनिल मोरे यांनी धाव घेतली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here