जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन…

 

जळगाव समाचार डेस्क| ३१ जुलै २०२४

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 5 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे. (Jalgaon)
जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here