चेक बाउन्स प्रकरणी तीन जणांना 12 लाखाचा दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा…

 

(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी, पारोळा

पारोळा येथे धनादेश अनादर प्रकरणी अमळनेर येथील तीन व्यावसायिकांना १२ लाख रुपयचा दंड व दोन महीन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारोळा येथील शिव कॉलनीतील रहीवाशी आशिष नानासाहेब निकम यांच्या कडून आरोपी गणेश रामलाल पाटील, जयवंत रामराव शिसोदे व महेश कैलास मोरे रा. अमळनेर यांनी डिसेंबर 2019 मध्ये 5 लाख व जून 2021 मध्ये 3 लाख रुपये एकुण 4 लाख रूपये एक वर्षाचे आत परत करण्याच्या बोलीवर एस.बी.एम मल्टीट्रेडर्स म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी हात उसनवारी ने घेतलेले होते. सदर रक्कम परत करण्या प्रित्यर्थ आरोपी यांनी फिर्यादीस दिनांक 26/08/2021 रोजीचा जळगांव जनता बैंक शाखा अमळनेर या नावाने धनादेश दिला होता. सदरचा धनादेश फिर्यादीने संबधीत बँकेत वटवण्यासाठी टाकला असता सदरचा धनादेश हा अनादरीत होवून फिर्यादीस परत मिळाला.
दरम्यान फिर्यादी आशिषराव नानासाहेब निकम यांनी पारोळा में. दिवाणी व फौजदारी न्यायालयात दावा दाखल केला होता. याप्रकरणी फिर्यादीची व आरोपी यांचा कडील संपूर्ण पुराव्यांचे अवलोकन करून तसेच फिर्यादी तर्फे करण्यात आलेला युक्तीवादाचा आधार घेवून, कोर्टाने आरोपींना खटाल्यात दोषी करार करून दिनांक 25/07/2024 रोजी १२ लाख रूपये दंड व २ महीने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात फिर्यादीच्या वतीने ॲड प्रशांत भिमराव ठाकरे पारोळा व ॲड,चेतन डि कुंभार यांनी कामकाज पाहिले व युक्तीवाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here