धुळे महामार्गावर अपघातात पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४

राज्यात सर्वत्र हिट अँड रनचे प्रकरण गाजत असताना, धुळे-सोलापूर महामार्गावर धुळे तालुक्यातील गरताड गावाजवळ कारला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून. या अपघातात धुळे येथील पत्रकार हर्षल भदाणे (ता. गरताड) यांचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य दोघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर सदर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने पोलिसांना माहिती न देता हा ट्रक सरळ चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहरात आणला. मात्र 12 पत्थर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे हा ट्रक तिथेच अडकला. या ठिकाणी देखील त्याने दोन दुचाकींना धडक दिल्यामुळे मोठी गर्दी गोळा झाली. दरम्यान गरताड येथे झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना कळाल्यामुळे पोलिसांनी देखील ट्रकचा शोधासाठी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. अखेर हा ट्रक धुळे शहरातील 12 पत्थर चौकातून पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने ताब्यात घेतला.
दरम्यान जमावातील काहींनी ट्रकवर दगड फेकले यावेळी एक दगड धुळे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जावेद शेख यांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी पत्रकार हर्षल भदाणे यांच्या अपघाती निधनाने सर्वच स्तरावरून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here