पारोळ्यात राष्ट्रीय लोक अदालतीत ७१ प्रकरणे निकाली…

 

(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी, पारोळा

येथील न्यायालयात दिनांक २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते, सदर लोकअदालतीचे पॅनल प्रमुख तसेच प्रमुख न्यायाधीश श्री. एम. एस. काझी हे होते तर पॅनल पंच म्हणून अॅड. व्ही. डी. महाजन यांनी काम पाहिले.
या लोकअदालतीत न्यायालयात दाखल असलेली दिवाणी २७ प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी ४ प्रकरणे निकाली निघून ११ लाख १७ हजार ९७२ रुपये तडजोडीअंती वसूल झाले, तर फौजदारी ९९ प्रकरणे ठेवली होती त्यापैकी ४६ प्रकरणे निकाली निघून १ लाख २७ हजार २४८ रुपये तडजोडीअंती वसूल झाले, असे एकूण १२६ पैकी ५० प्रकरणे निकाली निघून १२ लाख ४५ हजार २२० रुपये तडजोडीअंती वसूल झाले.
सदर लोकअदालतीत बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बॅंक, सेंट्रल बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आय.डी.बी.आय. बॅंक, बीएसएनएल व नगर परिषद, पारोळा या विभागांनी देखील आपली दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. सदर दाखल पूर्व प्रकरणात एकूण ९९८ प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी २१ प्रकरणे निकाली निघून त्यात २६ लाख १९ हजार ७६८ रुपये तडजोडीअंती वसूल झाले आहेत. असे न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे मिळून एकूण ठेवलेले ११२४ प्रकरणांपैकी ७१ प्रकरणे निकाली निघून त्यात एकूण ३८ लाख ६४ हजार ९८८ रूपये वसूल झाले.
तसेच जुन सन २०१३ चा प्रलंबित असलेला सुनिता दत्तात्रय पाटील वि. वेणुबाई गुलाबराव पाटील यांचा दिवाणी दावा तडजोडीने निकाली काढण्यात आला. तसेच सन २०२३ चे कौटुंबिक हिंसाचाराचे हिनाबानो मोनिस वि. मोनीस इकबाल खाटीक यांचे प्रलंबित असलेले प्रकरणात तडजोड घडवून अर्जदारास सा. वाले सोबत नांदणेस पाठविण्यात आले.
यावेळी जेष्ठ विधितज्ञ अनिलकुमार देशपांडे, ए. आर. बागुल, आनंदराव पवार, अॅड. ए. डी. पाटील, दत्ताजी महाजन, ए डी कश्यप, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.प्रशांत ठाकरे, सचिव अॅड. गणेश मरसाळे, अॅड. तुषार अशोक पाटील, वाय एन मोरे, तुषार के पाटील, सतीश पाटील, भुषण माने, एच एम कुलकर्णी, अकील पिंजारी, वेदव्रत काटे, सतीश एन पाटील, श्रीमती. कृतिका आफ्रे, स्वाती शिंदे, वि़द्या सुर्यवंशी, पुनम पाटील, गौरी कासार, ज्ञानेश्वर पाटील पोलीस केसवॉच यासह लोक अभिरक्षक कार्यालय, जळगांव येथील ॲड. हर्षल शर्मा व वकील संघाचे सदस्य, सरकारी अभियोक्ता मगर, पोलिस निरीक्षक सुनिल पवार, नगरपालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण व न.पा.कर्मचारी उपस्थित होते.
तसेच सदर लोक अदालत यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्री. बी. एम. भोसले, श्री एन. आर. पिंपळे, विलास ठाकुर, मधुसुदन बागड, एम. एस. पाटील, एम. एस. महाजन, श्रीमती एस. आर. पाटील, टी. एस. पवार, चैत्राम बी. पवार, समाधान एम. धनगर, डी. पी. देशपांडे, अनिल पवार आदि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यासह पक्षकार, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बॅंक, सेंट्रल बँक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बीएसएनएल, नगर परिषद व पोलिस विभाग आदि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here