जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४
मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची 125 वी बैठक गुरूवार दि. 01 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात संपन्न होणार आहे. मध्य रेल्वे चे महाव्यवस्थापक धर्मविर मिना यांच्या अध्यक्षतेत सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मध्य रेल्वे चे सल्लागार समिती सदस्य विराज कावडीया यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या विषयाचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. (Jalgaon)
या बैठकीत मध्य रल्वे अंतर्गत मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे व सोलापूर या विभागात येणाऱ्या सुमारे ५०० रेल्वे स्थानकांविषयी तसेच रेल्वे प्रवासी इ. विषयांवर चर्चा होणार आहे. सदर बैठकीत अध्यक्ष म्हणून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना उपस्थित राहणार आहेत. यासह मध्य रेल्वेतून सर्व विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सल्लागार समितीचे 52 सदस्य उपस्थित राहणार आहेत.
रेल्वेविषयी अडचणी व सूचनांसाठी संपर्काचे आवाहन…
दरम्यान जळगावकर नागरिकांना रेल्वे विषयी असणाऱ्या अडचणी व सूचना विराज कावडीया यांच्या 63, गणेशवाडी, जिल्हापेठ, पांडे चौक, जळगाव या संपर्क कार्यालयावर पोहचवाव्या असे आवाहन विराज कावडीया यांनी केले आहे.

![]()




